काश्मीरमध्ये भारतीय लष्कर मानवाधिकारांचं पालन करतं- जनरल हुड्डा

जुगल पुरोहित बीबीसी प्रतिनिधी Image copyright NurPhoto/GETTY जम्मू काश्मीर राज्याला लागू विशेष दर्जा काढून घेण्यासंदर्भात कलम 370 हटवण्यात आल्यानंतर काश्मीरमध्ये तैनात सुरक्षा दलांकडून अमानुष मारहाण आणि छळ केला जात असल्याचा आरोप होत आहे. लष्कराने या आरोपांचा इन्कार केला आहे. बीबीसीने यासंदर्भात निवृत्त लेफ्टनंट जनरल डीएस हुड्डा यांच्याशी बातचीत केली. सर्जिकल स्ट्राईक अभियानाचे प्रमुख म्हणून हुड्डा […]

पद्मसिंह पाटील: पवारांच्या वादग्रस्त 'नातेवाईका'चा राष्ट्रवादीला रामराम

हर्षल आकुडे बीबीसी मराठी प्रतिनिधी Image copyright facebook शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणा जगजितसिंह यांनीसुद्धा भाजपा-सेनेत दाखल झालेल्या इतर नेत्यांप्रमाणेच एक सभा घेतली. राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देणार असून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी या सभेत जाहीर केलं. मागच्या सहा महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात ‘आऊटगोईंग’ झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी यांच्यासह […]

घरकुल घोटाळा: सुरेश जैन यांना सात वर्षांचा कारावास तर गुलाबराव देवकरांना पाच वर्षांची शिक्षा

प्रवीण ठाकरे बीबीसी मराठीसाठी, नाशिकहून Image copyright Shrikant FSuresh Dada Jain/facebook प्रतिमा मथळा सुरेश जैन 45 कोटींच्या जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेश जैन आणि राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह तत्कालीन नगरसेवक आदींसह 48 संशयित आरोपींना धुळे जिल्हा कोर्टाने दोषी ठरवले. जैन यांना 7 वर्षं कारावास आणि 100 […]

पहिले लोक बोलायला टाळायचे, आता बनलीय 'मिस डेफ वर्ल्ड' – पाहा व्हीडिओ

ती खूप प्रश्न विचारायची. पुन्हा पुन्हा समजावून सांग म्हणायची. सगळे तिच्यापासून लांब राहायला लागले. पण, मागे हटायचं नाही, असं तिनं मनापासून ठरवलं होतं. ही गोष्ट आहे ‘मिस डेफ वर्ल्ड’ विदिशा बालियानची. विदिशाला स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं होतं, पण दुखापतीमुळे तिला टेनिस सोडावं लागलं. विदिशानं स्वत:ला सिद्ध करावं, असं तिच्या आईनं मनातून ठरवलं होतं. ज्या आईला आधी […]

उदयनराजे भोसलेंच्या आयुष्यातल्या या 10 वादग्रस्त घटना तुम्हाला माहीत आहेत का?

Image copyright Sai Sawant प्रतिमा मथळा उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले पुढच्या आठवड्यात दिल्लीमध्ये भाजप प्रवेश करतील असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांत त्यांच्या भाजप प्रवेशावरील चर्चांना उधाण आलं होतं. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना फोन केला होता आणि दिल्ली में आने के […]

विधानसभा निवडणूक: देवेंद्र फडणवीस सरकारचा घोषणांचा पाऊस महाराष्ट्रात सुकाळ आणेल का? – दृष्टिकोन

सुहास पळशीकर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक Image copyright Getty Images महाराष्ट्र हे एकेकाळी कारभाराच्या दृष्टीने चांगले मानलेले एक राज्य होते. हा लौकिक मागे पडूनही आता सुमारे पाव शतकाचा काळ लोटला. गेल्या कितीतरी वर्षांपासून लोकप्रियता आणि शासनव्यवहार यांच्यात फारकत झाली आहे. त्यामुळे राज्यात सरकारच्या कारभारात दोन वैशिष्ट्ये मध्यवर्ती ठरतात. एक म्हणजे काही झाले की मंत्री, मुख्यमंत्री किंवा […]

धुळेजवळच्या केमिकल कंपनीत जोरदार स्फोटानंतर आग

धुळे जिल्ह्यातील शिरपूरजवळच्या एका केमिकल कंपनीत स्फोट होऊन आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून किमान 22 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. वाहाड केमिकल कंपनीमध्ये हा स्फोट झाला असून आग रोखण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र ही केमिकल कंपनी असल्याने आग लगेच आटोक्यात येणे अशक्य आहे, जरा […]

ट्विटर CEO जॅक डॉर्सी यांचंच ट्विटर अकाऊंट झालं हॅक

Image copyright Getty Images प्रतिमा मथळा जॅक डॉर्सी अकाऊंट हॅक होऊ नये यासाठी सोशल मीडिया साईट्सद्वारे वेळोवेळी सूचना केल्या जातात. अकाऊंटचा दुरुपयोग होऊ नये यासाठी उपाययोजना सांगितल्या जातात. मात्र जी मंडळी या सूचना देत असते, त्यांचेच अकाऊंट हॅक झाले तर…? ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांच्याबाबतीत असंच घडलंय. जॅक […]

महाराष्ट्र विधानसभा: उदयनराजे भोसले म्हणतात, राजकारणापासून अलिप्त व्हावंसं वाटतंय #5मोठ्याबातम्या

Image copyright Twitter आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा : 1. राजकारणातून अलिप्त व्हावंसं वाटतंय – उदयनराजे सध्या राज्यात पक्षांतराचं वारं वाहतंय. तुम्ही कोणता नवीन राजकीय निर्णय घेणार आहात, या प्रश्नाला उदयनराजे यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं. “राजकारणापासून अलिप्त व्हावंसं वाटतंय,” असं उदयनराजे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. “राष्ट्रवादी […]

NRC: ‘ते’ 41 लाख लोक भारतीय आहेत की नाहीत?

प्रियंका दुबे बीबीसी प्रतिनिधी गुवाहाटीहून Image copyright PTI राष्ट्रीय नागरिक नोंदणी मसुदा म्हणजेच NRCची शेवटची यादी शनिवारी सकाळी 10 वाजता प्रसिद्ध होणार आहे. हे होण्याआधी आसाममध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सोबतच हिंसाचार आणि धार्मिक तेढ वाढण्याची भीती असल्याने पोलीस, प्रशासन आणि गृहमंत्रालय वेगवेगळ्या पातळीवर लोकांना शांत राहण्याचं आणि कुठल्याही अफवांवर विश्वास न […]